आमच्या सांकेतीक स्थळावर आपले स्वागत आहे.

ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत ग्राहकाभिमुख सेवा सुविधा देण्याकरिता आम्ही नागपूर जिल्ह्यात कार्यरत आहोत.

२ शाखांमधून २५००० हुन अधिक ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवीत आहोत. संस्थेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांद्वारे ग्राहकांना त्यांच्या ध्येयप्राप्तीकरिता मदत आम्ही करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने हीच आमची कमाई आहे. येणाऱ्या काळात अशाचप्रकारे आपली सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या आणि विश्वासाने आमच्याबरोबर उभे रहा.

  • संस्थेच्या विविध योजना
  • संस्थेचे वैशिष्ट्ये
  • संस्थेचा इतर क्रियाकलाप

"आमच्याबद्दल"

गरिबांचे जीवन समुद्ध करणारी 'श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.'


मागील ३१ वर्षांपासून अविरत गरीब व गरजू नागरिकांना साधारण कर्जापासून ते व्यसायिक कर्ज उपलब्ध करून देत. त्याचे जीवन समृद्ध करण्यास मदत करणारी संस्था म्हणून आज श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि. केवळ पारडी परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. १ ऑगस्ट १९९० साली पूर्व नागपुरातील पारडी परिसरात पतसंस्था व बँकांची संख्या नगण्यच होती. यामुळे या भागातील नागरिकांना बर्डी, इतवारी, गांधीबाग या परिसरात जावे लागायचे. महत्वाचे म्हणजे पारडी भागात पानटपरी चालविणारे, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, हातमजूर करणाऱ्याची संख्या जास्त होती. मात्र बँक या गरीब नागरिकांना कर्ज देण्यास नकार देत होती. हि एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता गरिबांना मदत व्हावी, यासाठी या भागात एखादी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पतसंस्थेचे पहिले अध्यक्ष सत्यवान रारोकर व सचिव लक्ष्मणराव बावनकुळे यांच्या नेतुत्वात १ ऑगस्ट १९९० रोजी श्री शुभलक्ष्मी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी खातेदार कडून १ लाख ७५ हजार रुपये गोळा करून संस्थेचा कार्याचा शुभारंभ झाला. सुरवातीला बावनकुळे यांच्या घरी १० बाय २० च्या खोलीत या पतसंस्थेचे कामकाज चालायचे. त्यावेळी केवळ दोन लिपिक एक शिपाई असे तीन कर्मचारी कार्यरत होते.



पतसंस्थेच्या दुसऱ्या क्रमांकाचे अध्यक्ष पांडुरंग मेहर तर तिसरे अध्यक्ष म्हणून गंगाधर लेंडे यांनी आपला यशस्वी कार्यकाळ राबविला. बँकिंग क्षेत्राच्या अनुभवाच्या जोरावर पतसंस्थेच्या डोलारा सांभाळणारे सचिव म्हणून कार्य केलेले नारायण अर्सपुरे याची कारकीर्द विशेष गाजरी , हे येथे उललेखनीय.

आज या पतसंस्थेची स्वतःच्या मालकीची झाशी राणी चौक, पार्डी येथे विस्तुत अशी इमारत आहे. सॅन २००० साली हि इमारत उभारण्यात आली. तर २०१६ मध्ये दिघोरी, टेलिफोन नगर, येथे उपशाखा उघडण्यात आली.मुख्य शाखेत २५ कर्मचारी बी ७० ते ८० अभिकर्ते अशा एकूण आज जवळपास १०० कुटुंबांचा उदरनिर्वाह या पतसंस्थेवर चालतो. या पतसंस्थेद्वारे व्यवसायिक कर्ज, साधारण कर्ज, वाहन कर्ज, तारण कर्ज, व घरबांधणी कर्ज दिल्या जाते. आज संस्थेची आर्थिक स्थिती ७ कोटी ९३ लाख ९० हजार ३२५ रुपयांचे भाग भांडवल आणि ४९ कोटी ६ लाख ७३ हजार १८ रुपये एकूण ठेवी आहे.


सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र कापसे व उपाध्यक्षपदी दिवाकर धोपट, संचालकपदी पांडुरंग मेहर, गंगाधर लेंडे, नितीन अरसपुरे, किशोर नागपुरे, प्रभाकर राऊत, फकीरचंद रारोकर, स्वाती बावनकुळे, रुपाली गिरी, वंदना मानकर, ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हरिचंद मारोडे व व्यवस्थापकपदी सुनील नागोसे कार्यरत आहे. संस्थेचे एकूण ७ हजार १८० सभासद आहे. विशेष म्हणजे, या पतसंस्थेला मागील पाच वर्षांपासून अंकेक्षण वर्गाचा 'अ' दर्जा प्राप्त आहे. संपूर्णपणे सहकारी तत्वावर चालणाऱ्या या संस्थेचे जिल्हास्तरावर कायक्षेत्र वाढविणे, खातेदारासाठी लॉकर बी सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे आदी उद्देश लवकरच पूर्ण करण्यात येणार.