दैनिक बचत ठेव खाते (Pigmy Deposits)

तुमची आजची छोटी छोटी बचत, मोठी मोठी संकटे दूर करू शकते.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

दैनिक बचत ठेव खाते (Pigmy Deposits)छोट्या-छोट्या बचतीतून मोठी रक्कम उभी राहते. संस्थेच्या दैनिक बचत ठेव योजनेमुळे तुमची रोज थोडी थोडी बचत होते व त्यावर चांगला परतावा मिळतो.

दैनिक ठेव बचत खात्यात दररोज जमा होणाऱ्या रकमेवर संस्थेच्या नियमा नुसार 4% व्याज देण्यात येईल.

क्र. नियम व अटी
श्री. शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तर्फे नेमलेल्या व त्याच्या जवळ दैनिक रक्कम गोळा करण्याचे श्री. शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे प्रमाणपत्र आहे. असे अधिकृत श्री. शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नागपूर च्या वतीने रोज दैनिक हप्त्याची रक्कम वसूल करतील. वसूल केलेली रक्कम वसूल केलेल्या वेळेपासून 24 तासाच्या आत जमा करावी लागेल. (सुट्टीचे दिवस वगळता)
या योजनेत प्रत्येक खातेदार दररोज ५०, १००, ५००, १००० किंवा त्याच्या पटीत रुपये दररोज भरू शकेल.
दैनिक ठेव खात्याची मुदत १ वर्षाची राहील व करारानुसार खातेदारास प्रत्येक महिन्याच्या जमा होणाऱ्या रकमेवर मासिक प्रॉडक्ट पद्धतीने मुदतीनंतर व्याज देण्यात येईल. परंतु जे खाते १ वर्षाच्या वर झाले असेल अशा खात्यावर मुदतीनंतर जास्त झालेल्या कालावधीचे व्याज दिले जाणार नाही. परंतु कर्जा पोटी असलेल्या खात्यात वरील नियम लागू नसून कर्ज घेणाऱ्या खातेदारास सदर कर्ज संपेपर्यंत सदर खाते सुरु ठेवावे लागेल.
दैनिक रकमेचा भरणा दररोज केला पाहिजे. विशिष्ठ अडचणी असल्यास आठ दिवसाचे हप्ते एका वेळेस घेतले जातील.
जे खाते ७ महिन्याच्या आत बंद होत असेल त्या खात्यादाराकडून व्यवस्थापन शुल्क रु. ११% कपात करण्यात येईल.
जे खाते ७ महिन्याच्या वर व १ वर्षाचे आत बंद होत असेल त्यास व्याज दिले जाणार नाही.
खाते सुरु करतांना दैनिक ठेवीची रक्कम व मुदत लिहून घ्यावी लागेल जर खातेदार नियम क्र. २ प्रमाणे व्याज देण्यात येईल.
नियम क्र. ६ मध्ये दर्शविलेल्या तक्त्यात दिलेल्या रकमांमध्ये वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवलेला आहे.
दैनिक बचत ठेव खात्यावर जमा असलेल्या रकमेच्या ८०% खातेदाराला कर्ज मिळू शकेल. व त्यावर द. सा. द. शे. १६% व्याज आकारण्यात येईल.
१० कर्ज मागतांना खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. व कर्जाची रक्कम ५००/- पेक्षा कमी असणार नाही.
११ दैनिक ठेवीवर दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याजाचा दर वेळोवेळी ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळाला राहील.
१२ कर्जाची मुदत ११ महिन्यापेक्षा किंवा दैनिक ठेवीच्या मुदतीपेक्षा जास्त राहणार नाही. कर्ज घेतल्यावर सुध्दा दैनिक रक्कम भरावी लागेल. .
१३ दैनिक ठेवीची रक्कम मुदत संपेपर्यँत जर कर्जांची पूर्ण परतफेड झाली नसेल तर कर्जांची रक्कम आणि त्यावरील व्याज दैनिक ठेवीमधून वळती करून उरलेली रक्कम खातेदारास परत करण्यात येईल. ज्या खातेदाराकडे साधारण कर्जाचा हप्ता आगाऊ सूचनेप्रमाणे दैनिक बचत खात्यातून नियमित कर्ज खात्यामध्ये जमा करता येईल.
१४ संस्थेचे पासबुक हरविल्यास अर्जासोबत रु. २५/- भरून नवीन पासबुक मिळू शकेल. ( + जी. एस. टी. रक्कम )
१५ संस्थेनी तपासणीसाठी पासबुक सांगितल्यास स्वतः संस्थेत पासबुक घेऊन यावे किंवा एजेंटजवळ पासबुक तपासणीस गोळा करण्याचे संस्थेचे पत्र असल्यास आप आपले पासबुक एजंट जवळ दयावे.
१६ विड्रॉलचे पैसे स्वतः घेऊन जावे. एजंट किंवा इतरामार्फत मागीतल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. याची नोंद घ्यावी.
१७ मुदतीनंतरचे व अनियमित खाते बंद करण्याचे अधिकार संस्थेस राहील. याबाबत खातेदारास कोणतीही सूचना देण्यात येणार नाही.
१८ संस्थेने नियुक्ती केलेल्या दैनिक बचत ठेव प्रतिनिधी कडे आपण खाते उघडल्यास आपणांस दैनिक बचत ठेव प्रतिनिधीद्वारे पासबुक देण्यात येईल. खातेदारास पासबुक न मिळाल्यास संस्थेच्या कार्यालयात ताबडतोब तक्रार करावी. आपण दिलेल्या रक्कमेची पावती घ्यावी व चुकीची दुरुस्ती तपासून दुरुस्ती करून घ्यावी.
१९ खाते उघडतांना जमा असलेली रक्कम ज्याला घ्यावयाची असेल त्या वारसदाराचे नाव व पत्ता स्पष्ट नमूद करावा. मात्र तो वारसदार अज्ञान नसावा. आपण नोंद केलेल्या पत्यावर पत्रव्यवहार केला जाईल. सबब पत्ता बदल्यास ताबडतोब कळवावे.
२० संस्थेतर्फे नेमलेल्या व ज्याच्याजवळ दैनिक रक्कम गोळा करण्याचे संस्थेचे प्रमाण पत्र आहे. असे अधिकृत प्रतिनिधि संस्थेच्या वतीने दररोज दैनिक हप्त्याची रक्कम वसूल करतील.
२१ प्रत्येक खातेदाराने या बाबतीत संस्थेचे नियम वाचले असून त्याना ते मान्य आहेत असे समजले जाईल. या योजनेच्या नियमात कोणतीही सूचना न देता बदल करण्याचा व त्यात नवीन भर घालण्याचा अधिकार संस्थेने स्वतःकडे राखून ठेवला आहे.