आधुनिक बँकिंग सुविधा ज्या सुरक्षित आणि वेगवानही आहे.
अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री. शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.
| क्र. | नियम व अटी |
|---|---|
| १ | कर्ज मागणी अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती स्वहस्ताक्षरात सविस्तर भरावी. |
| २ | कर्जाची रक्कम रोखीने दिली जाणार नाही. ती चेक ने अथवा त्याचे बचत खात्यात जमा केली जाईल. |
| ३ | आधार कार्ड,पॅन कार्ड, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, टेलेफोन बिल, दोन फोटो इत्यादी देऊन पूर्तता करून घेणे. |
| ४ | साधारण कर्जाची मर्यादा १,००,०००/- (एक लाख) पर्यंत राहील. |
| ५ | एक लक्ष पेक्षा जास्त कर्जासाठी तारण द्यावे लागेल. |
| ६ | कर्ज मागणी वेळी दोन जमानतदार असणे अवश्य आहे. व ते जमानतदार त्याच्या कुटूंबातील असू नये. जमानतदारचे फोटो व आधारकार्ड जोडावे. |
| ७ | जमतदारने कर्ज घेतले असेल तर तो थकबाकीदार असू नये. |
| ८ | एका सभासदास एक किंवा दोन कर्जदारास जामीन राहता येईल. |
| ९ | कर्ज मंजूर झाल्या पासून तीन महिन्याच्या आत कर्ज उचल करणे आवश्य आहे. उचल न केल्यास कर्ज नामंजूर होईल. |
| १० | करदारास कर्जाचे पासबुक देण्यात येईल. ते पासबुक भरून घेण्याची जबाबदारी कर्जदाराची राहिल. |
| ११ | मुत व्यक्तीचे कोणतेही कागद पत्रे कर्ज अर्जासोबत जोडु नये. |
| १२ | ताबा पत्र किंवा कब्जापत्रावर कर्ज दिले जाणार नाही. |
| १३ | एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला कर्ज दिले जाईल. (दोन कर्ज नाही). |
| क्र. | नियम व अटी |
|---|---|
| १४ | जुने कर्ज परतफेड झाल्या शिवाय नवीन कर्ज दिले जाणार नाही. |
| १५ | कर्जदार नोकरी करत असल्यास पगाराचा दाखला व हमीपत्र देणे अवश्यक आहे. |
| १६ | अर्जदार सभासद व्यवसाय करीत असेल तर व्यवसायाची संपूर्ण माहिती ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक, इन्कम टॅक्स रिटर्न, गोमस्त लायसन पत्रक. |
| १७ | अर्जा सोबत खालील माहिती जोडणे आवश्यक आहे. |
| अ) | मालमत्तेचे मूळ कागद्पत्रक (रेजिस्टरी). |
| ब) | वर्षाची टॅक्स पावती. |
| क) | मालमत्तेचा मागील १३ वर्षाचा सर्च रिपोर्ट. |
| ड) | मालमत्तेचा सध्याचे मूल्यांकन. (valuation). |
| इ) | सिटी सर्वे बाबतीत आखीव पत्रिका. |
| १८ | कर्जदार बी जमानतदार यांची समाजात असलेली पत बी त्याचे संस्थेसोबत केलेल्या व्यवहाराबाबत थोडक्यात माहिती देणे. |
| १९ | अर्जदार सभासदाने इंतरत्र सोसायटी मधून कर्ज घेतले नसल्यास प्रमाणपत्र देणे. |
| २० | तारण मिळकतीचा विमा कर्जदाराने स्वखर्चाने उतरविला पाहिज. |
| २१ | संस्थेच्या कर्जाच्या बोजाची नोंद करून घेतली पाहिजे. |
| २२ | शिफारस दैनिक अभिकर्ता बी संचालकांचे सदर कर्ज वसुलीबाबतचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपर वर हमीपत्र बी प्रतिज्ञा पत्र घेण्यात येईल. |