बचत ठेव खाते (Savings Account)

बचतीला पर्याय नाही.

अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

बचत ठेव खाते (Savings Account)तुमच्या ठेवींवर अधिकाधिक परतावा मिळण्याच्यादृष्टीने हि योजना अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या खात्यातल्या रकमेवर खात्याचा व्याजदर: 3% p.a. इतका देण्यात येत. (W.E.F. 01/01/2020)

नियम, अटी आणि खाते उघडण्या करिता आवश्यक कागदपत्रे

क्र. नियम, अटी
विविध प्रकारचे खाते उघडले जाऊ शकतात. अ] व्यक्तिगत/संयुक्त/18 वर्षावरील
कमीत कमी रु. 300/- सुरवातीची शिल्लक घेऊन खाते उघडल्या जाईल.
संपर्क व सेवेसाठी पत्ता/टेलिफोन/मोबाईल/ई-मेल देणे व वेळोवेळी बदल झाल्यास संस्थेला कळविणे.
बचत खाते स्लीपवर भरणाऱ्याची सही करणे आवश्यक आहे.
पासबुक सांभाळून ठेवणे व संभावित धोका टाळण्यासाठी पासबुकवर सही करू नये
एकाच व्यक्तीच्या नावाने एकच बचत खाते (संयुक्तिक खाते वगळता) उघडला जाईल.
बचत खात्यावर व्याज आकारणी करताना रु. 1.00/- पेक्षा कमी व्याज खात्यात जमा करता येणार नाही.
बचत खात्याची पुस्तिका हरविल्यास पुन्हा रु. ३५/- देवून पुस्तिका तयार करून देता येईल.
रक्कम काढते वेळी स्वतः उपस्थित रहावे अन्यथा त्या रक्कमेची जबाबदारी त्या खातेदारावर राहील.
१० नियमामध्ये बदल करण्याचे अधिकार संस्थेचे व्यवस्थापन मंडळाला राहील.
११ व्यवहार झाल्यानंतर खाताधारकानी पुस्तिका तपासून घ्यावी.
१२ बचत खात्यात दोन वर्षापर्यंत व्यवहार सुरु नसल्यास ते खाते बंद करण्याचे अधिकार संस्थेचे राहील.
१३ RTGS/NEFT द्वारे राशी अन्य बँकेच्या आपल्या द्वारे असलेल्या खात्यात हस्तांतरित करण्याची सेवा उपलब्ध आहे.
क्र. खाते उघडण्या करिता आवश्यक कागदपत्रे
अ] वैयक्तिक आणि HUF –
आधार कार्ड
पासपोर्ट / PAN कार्ड
विजेचे बिल/ पाण्याचे बिल/ टेलीफोनचे बिल (मागील ३ महिन्यातले)
गॅस कनेक्शन कार्ड (३ महिन्यापेक्षा जुने नको)
३ passport size फोटो.